महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका माळशिरस ची कार्यकारणी जाहीर
दिनांक 19/10/2024 वार- शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती माळशिरस चे त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळेस तालुका नेते श्री. अशोक रुपनवर सर, तालुका अध्यक्ष श्री. रमेश सरक सर, कार्यकारी अध्यक्ष श्री. दत्तात्रेय रणदिवे सर, सरचिटणीस श्री. लालासाहेब गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल भगत सर, कार्याध्यक्ष श्री दुर्योधन मिसाळ, श्री आत्माराम गायकवाड, कोषाध्यक्ष श्री शिवाजी सावंत, शिक्षक नेते पदी लकी जाधव,तालुका संपर्कप्रमुख म्हणून अजिनाथ कोळी व श्री संजय पाटील तसेच तालुका संघटक पदी श्री अनिल बाबर, प्रसिद्धीप्रमुख श्री जब्बार मुलाणी सर यांच्यासह एकूण 23 पदाधिकारी यांच्या विविध पदावर निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश पवार सर, राज्याचे उपाध्यक्ष श्री राजन सावंत सर तसेच जिल्हा सरचिटणीस श्री. शरद रुपनवर व अमोगसिद्ध कोळी सर यांच्यासह शिक्षक समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.