जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि प सदाशिवनगर चा विद्यार्थी चैतन्य शहाजी पालवे तृतीय
सोमवार दिनांक 9/ 12/ 2024 रोजी कुर्डूवाडी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुणवत्ता शोध चाचणी वक्तृत्व स्पर्धेत जि. प.प्रा. शाळा सदाशिवनगर ता. माळशिरसचा विद्यार्थी चैतन्य शहाजी पालवे याने तृतीय क्रमांक पटकावला.
त्यानिमित्त शाळेत त्याचा गुणगौरव सोहळा करण्यात आला. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री हमीद मुलाणी सर ,श्री.मदन सुळे, श्री.बडाभाई मुलाणी, सौ पुनम ओव्हाळ , श्रीम. मीनाक्षी शिंगाडे,श्रीम. कांबळे मॅडम, सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे वडील व त्रिमूर्ती क्लासेसचे संचालक श्री. शहाजी पालवे सर, आई सौ. मनीषा पालवे, आजोबा श्री. सुखदेव विठोबा पालवे आजी सौ. भामाबाई सुखदेव पालवे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रदीपकुमार करडे साहेब, विस्तार अधिकारी सौ. सुषमा महामुनी, केंद्रप्रमुख श्री. सुलतान शेख यांनी अभिनंदन केले.