शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी शेतकरी निर्धार परिषद | महामार्ग विरोधी आंदोलनाने राजकीय भूमिका घेणे गरजेचे: खासदार शाहू महाराज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राजन क्षीरसागर यांच्या कडून|


*शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाने राजकीय भूमिका घेणे गरजेचे: खासदार शाहू महाराज*
*शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारचे विधानसभा निवडणुकीत उमेदवार पराभूत करण्याचा ठराव संमत*
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, महामार्ग रद्द न करणाऱ्या माहिती सरकारचे उमेदवारांना पराभूत करा, बारा जिल्ह्यांमध्ये महायुती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करा अशा ठरावांसहित आज राज्यव्यापी निर्धार परिषद यशस्वीरित्या पार पडली.
आज दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी शेतकरी निर्धार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बोलताना *खासदार शाहू महाराज* म्हणाले की,” गेले आठ महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कडे दुर्लक्ष करणे ही महायुती सरकारची चूक असून निषेधार्थ बाब आहे. शेतकऱ्यांनी महायुती उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली तर ती योग्यच आहे. आचारसंहितेपूर्वी सरकारने महामार्ग रद्दचा निर्णय घेणे गरजेचे होते. त्यामुळे आता सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल.


*अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर म्हणाले*,”ब्रिटिश कालीन 1894 घ्या भूसंपादन कायद्यावर आधारित तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी बनवलेला 1955 चा राज्य महामार्ग कायदा हा रद्द केल्याशिवाय कोणतेही भूसंपादन महाराष्ट्रात करू देणार नाही. भाजप सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांचे शक्तिपीठ महामार्ग हा भाग आहे. येणाऱ्या निवडणुकीत सरकारला पराभूत करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करूया.


*भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यसहसचिव डॉ अमृता पाठक* म्हणाल्या,” भाजपची धोरणे ही सातत्याने शेतकरी विरोधी विद्यार्थी व महिला विरोधी राहिली आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या लढ्याचा आदर्श आंदोलन बनले आहे. याला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला पाहिजे. सरकारला महामार्ग रद्द करायला भाग पाडूनच आंदोलन थांबले पाहिजे.

*संजय बाबा घाटगे* म्हणाले,” मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो असे तोंडी आश्वासन देऊन देखील लेखी आदेश न करता शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. खोटी आश्वासने देऊन त्याची पूर्तता न करणे अशी राजकीय संस्कृती या माहिती सरकारच्या काळात सर्वोच्च पातळीवर खालावली आहे.
विजय देवणे म्हणाले,”महायुती चे सरकार हे आतापर्यंत सर्वात खोटारडे सरकार आहे. राज्यावर कर्जबाजारीपणा वाढवून कोणताही विकास न करता केवळ कंत्राटी रस्ते करत सुटणे हेच यांचे धोरण आहे. त्यावरच्या मलीद्यावर हे निवडणुका लढतात.


समरजीत घाटगे म्हणाले,”कोल्हापुरातील जमिनी या बागायत जमिनी आहेत. शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध त्या जमिनी काढून घेणे ही महायुती सरकारची सर्वात लज्जास्पद कारकीर्द आहे. शरद पवारांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत आहे. समन्वयक गिरीश फोंडे यांनी मनोगत व्यक्त करताना आंदोलनाचा आढावा घेताना तीन महत्त्वपूर्ण ठराव मांडले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारचे उमेदवार पराभूत करावेत, बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध टीम करून महायुती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणार. असे ठराव केले.
उमेश देशमुख म्हणाले,” महायुतीचे सरकार सर्वसामान्यांच्या मुळावर उठले आहे. हे खरे म्हणजे कंत्राटदारांचे सरकार आहे.


यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.समन्वयक गिरीश फोंडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख,नांदेडचे शेतकरी सतीश कुलकर्णी, परभणीचे विजय बेले, सांगलीचे उमेश एडके, सिंधुदुर्गचे नंदन वेंगुर्लेकर, लातूरचे अनिल ब्याळे, सोलापूरचे गणेश बोडके, हिंगोली चे ज्ञानेश्वर कराळे यांची भाषणे झाली.
यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात लढण्याची शपथ घेतली.
परिषदेचे प्रास्ताविक कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केले, सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी तर आभार दादासो पाटील यांनी मानले.
परिषदेस विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विक्रांत पाटील, एम पी पाटील, महादेव धनवडे, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, आनंदा पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, तानाजी भोसले, जम्बु चौगुले, नितीन मगदूम यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार