श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२४-२५,* चा *५२ वा बॉयलर अग्नी प्रदिपन* संपन्न
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२४-२५,* चा *५२ वा बॉयलर अग्नी प्रदिपन* शुभारंभ *सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
यावेळी कारखान्याचे संचालक सुनील माने व त्यांच्या सुविद्य पत्नी सविता सुनील माने यांच्या शुभहस्ते *सत्यनारायण पूजा* करण्यात आली.
यावेळी बोलताना *श्री शंकर सहकारी चे व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सन 2023-24 गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊसास तिसरा व अंतिम हप्ता रक्कम रु 50/- प्रती मे टन तसेच दिपावली निमित्त कामगारांना १५ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.*
या कार्यक्रमास *सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ऍड. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सौ. सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, मा. सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,* कारखान्याचे संचालक ऍड. सुरेश पाटील, प्रफुल्ल कुलकर्णी, सुधाकर पोळ, बाळासो माने, रामचंद्र खुळे, सदाशिव पाटील, शिवाजी गोरे, रामदास कर्णे, कुमार पाटील, सचिन लोकरे, दत्तात्रय मिसाळ, दादासो वाघमोडे, महादेव शिंदे, सौ.लिलावती देवकर, विलास फडतरे, विलास आद्रट, अनंतलाल दोशी, देविदास ढोपे, शिवाजी जाधव, बिनू पाटील, संतोष शिंदे, लक्ष्मण मोहिते, विजय खराडे, एकनाथ वाघमोडे, भोजराज माने, शिवराज निंबाळकर, हुसैन मुलाणी, अभिमान सावंत, अरविंद भोसले, दत्ता चव्हाण, दत्ता भोसले, उदय धाईंजे, सुरेश मोहिते, युवराज देशमुख, ज्ञानदेव निंबाळकर, पोपट निंबाळकर, ज्ञानदेव पाटील, बलभीम निंबाळकर तसेच कारखान्याचे *एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप,* सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख आदी तसेच शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, कामगार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.