श्री शंकर सहकारी कारखाना ठरत आहे पश्चिम भागाला योगदान. प्रतिनिधी :-अनेक अडचणींचा सामना करत शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्काचा सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर. आदरणीय काकासाहेब यांच्या दूरदृष्टीकोनातून उभारलेला हा कारखाना आज लोकप्रिय नेते श्री शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नवयुवकांचे आदर्श नेतृत्व असलेले अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या देखरेखेत प्रगीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. या कारखान्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी आल्या परंतु श्री शंभु महादेवाच्या कृपेनें सर्व अडचणींवर मात करत श्री शंकर सहकारी तटस्थ उभा राहिला. आज हा कारखाना पश्चिम भागाला योगदान ठरत आहे. या कारखान्यामुळे अनेकांच्या घरातील चुली पेटल्या, अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला, व्यापार व बाजार पेठा फुलल्या. एकंदरीत या भागातील अर्थकरणाला चालना मिळाली.आदरणीय कै. शंकरराव मोहिते पाटील ( काकासाहेब ) यांचे स्वप्न विधानपरिषद आमदार तथा श्री शंकर सहकारी चे