ग्रामपंचायत सदस्य यशवंत गेजगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा
अकलूज वार्ताहर|
लवंगमधील सामाजिक कार्यकर्ते व विधेमान ग्रामपंचायत सदस्य यशवंत गेजगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेजगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लवंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग सेकशन येथे वृक्ष रोपन करून, मुलांना वही व पेन खाऊ वाटत करण्यात आला. मुलांना व शाळेसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्या दिल्याबद्दल, त्यांचे कौतुक करण्यात आले.
त्यानंतर शाळेच्या वतिने यशवंत गेजगे यांचा वाढदिवस साजरा केला.
या वेळी मुलांनी व शिक्षक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी लवंगचे सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच प्रशांत भिलारे,पोलीस पाटील विक्रम भोसले अंकुश वाघ, किसन गोरे,नारायण चव्हाण,युवराज वाघ, धनाजी चव्हाण सर, प्रदीप कदम दत्तात्रय चव्हाण, राहुल टिक विपूल वाघ, शंभूराजे पाटील,मोहन कांबळे,यशवंत पारसे इ. उपस्थित होते.
शिक्षक- काझी सर,उमाप सर,शिंदे मॅडम,उमाप मॅडम
कार्यक्रमचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनि केले.
यावेळी सरपंच प्रशांत पाटील यांनी बोलताना म्हणाले की यशवंत गेजगे यांनी आज शाळेत वाढदिवस साजरा करून व शैक्षणिक साहित्या देऊन गावातील तरुणांना समाजिक संदेश दिला आहे. यापुढे लवंग गावातील तरुणांना मी आवाहन करतो की वाढदिवसाच्या निमित्त अनावश्यक खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवून आपला वाढदिवस करावा.