*प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने बँक ऑफ इंडियाच्या विरोधात हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा.*
*प्रतिनिधी :- प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने बँक ऑफ इंडियाच्या विरोधात 24 सप्टेंबर 20024 रोजी हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. माढा तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या सर्वच शाखेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आणि आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून दिले जाणारे कर्ज मिळत नाही. तसेच बँकेचे सर्वच कर्मचारी शेतकऱ्यांना अरेरावी ची भाषा वापरतात. तसेच आपल्या लऊळ बँकेच्या बाबतीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्ज देत नसल्या बाबत, कर्मचाऱ्यांच्या अरेरावीची भाषे बाबत भरपूर तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आपल्या कर्मचाऱ्यांकडून कमिशन ची मागणी केली जाते. हे सर्व प्रकार बंद करून शेतकरी v4 व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने 24 सप्टेंबर रोजी लऊळ बँकेच्या दारात हालगी नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांनी दिला आहे. त्या प्रसंगी जिल्हा समन्वयक पंडित साळुंके , तालुका अध्यक्ष अमोल केसरे, बापू नलवडे, संतोष कोळी उपस्थित होते.*