राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी तुकाराम साळुंखे पाटील यांची निवड
प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी तुकाराम साळुंखे पाटील यांची नेमणूक करण्यात आली साळुंखे हे संघटक सचिव म्हणून काम करत होते त्यांनी पक्षाचे संघटक म्हणून लोकसभा विधान सभा यावेळेस चांगल्या प्रकारे काम केल्याने पक्षाचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयदेव गायकवाड राज्यप्रमुख पंडित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम साळुंखे पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली
साळुंखे हे महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आज पर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे पक्षश्रेष्ठीने निवड केल्याने समाजाकडून व पक्ष पदाधिकाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे