प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज
*४४ वी समूह नृत्य स्पर्धा* (निकाल पाहा )

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज*

*४४ वी समूह नृत्य स्पर्धा*

*शंकरनगर येथील समूहनृत्य स्पर्धेत शहरीतून महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, तर ग्रामीण मधून बाणलिंग विद्यालय ने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद*

दिनांक- २४.१२.२०२४

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर- अकलूज च्या वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे दि. २२ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत स्मृतीभवन शंकरनगर या ठिकाणी झालेल्या शालेय मुला-मुलींच्या समूह नृत्य स्पर्धेत शहरी गटातून महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला तर ग्रामीण मधून बाणलिंग विद्यालय ने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
      तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील सर्व गटातुन सर्वोत्तम गुण संपादन केलेल्या ग्रामीण व शहरी गटातील संघास सर्वसाधारण विजेत्याचा व आज झालेल्या गटांचा बक्षीस वितरण समारंभ अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, मा.श्री.नितीनराव खराडे पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.श्री अभिजित रणवरे, सहसचिव मा.श्री हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी युवानेते मा. चि
सयाजीराजे मोहिते पाटील यांनी कलाकारांच्या कलेचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी शि.प्र.मंडळ संचालक सुभाष दळवी, पांडुरंग एकतपुरे, रामभाऊ गायकवाड, निशा गिरमे उपस्थित होते.
ही स्पर्धा ग्रामीण व शहरी या गटातून घेण्यात आली. यामधील दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेतील विवेक प्राथमिक विद्यालय, पंढरपूर व हनुमान विद्यालय, तोंडले यांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ११३ गीते सादर झाली. यामध्ये १७७५ कलाकारांनी आपली कला सादर केली.  स्पर्धेच्या अंतिम दिवशी गट क्र.४ व ५ प्रासंगिक नृत्य प्रकारात गट ४ मधून १३ तर गट ५ मधून १४ गीते सादर झाली
      याप्रसंगी बोलताना प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा मा.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी मा.बाळदादांनी दिलेली अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना दडपण आले होते पण सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सर्व उपक्रम व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडत आहोत. गेल्या ४४ वर्षापासून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने मंडळ अनेक राज्य-राष्ट्रीय स्पर्धा, विविध कार्यक्रम उपक्रम दर्जेदारपणे पार पाडत आहोत. या स्पर्धेतील कलाकार हे व्यावसायिक कलाकारांपेक्षाही सरस कला सादर करत आहेत. कलाकारांना मार्गदर्शन करताना त्यांनी हार-जीत न मानता कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे. मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे शिकले पाहिजे. यावेळी त्यांनी त्यांच्या पालकांचेही आभार मानले.
याप्रसंगी परीक्षक आशिष देसाई यांनी स्पर्धेतील कलाकारांना मार्गदर्शन करताना स्पर्धेतील अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावेत असा संदेश दिला.
आज झालेल्या प्रासंगिक गीतातून देशभक्तीपर, स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण, कौटुंबिक, मानसिक ताणतणाव, पर्यावरण जागृती, मैत्री, व्यसनमुक्ती, शैक्षणिक, सामाजिक विषमता, संदेशवहन यासारख्या अनेक सामाजिक व संवेदनशील विषयांवर प्रासंगिक गीतातून प्रकाश टाकण्यात आला. या गीतातून दोन्ही गटातील शाळा,महाविद्यालयांनी आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गटांतर्गत चुरस पहावयास मिळाली.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आजच्या झालेल्या स्पर्धेचा गटवार निकाल पुढील प्रमाणे
गट ४- (ग्रामीण गट) प्रथम- श्री. बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस द्वितीय-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय,नातेपुते, तृतीय- कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती,
(शहरी गट) प्रथम-महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर द्वितीय- सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज तृतीय- जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज
गट क्र. ५-(महाविद्यालयीन गट) प्रथम-सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज
द्वितीय- शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज तृतीय-महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर चतुर्थ- स. म. शंकरराव मोहिते पाटील इंजिनीरिंग कॉलेज, शंकरनगर, पाचवा- कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय, सदाशिवनगर
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
या समारंभास मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड, संजय गळीतकर, दिलीप शिर्के, नामदेव काळे, संचालक, सदस्य, पत्रकार, कलाकार, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर, बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन इलाही बागवान, किरण सूर्यवंशी, राजकुमार पाटील, यांनी केले. ही स्पर्धा सर्व कमिटीतील सदस्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. सारे जहाँ से अच्छा या समूह गीताने स्पर्धेची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक