संगणक परिचालक संघटना उपध्यक्षपदी सागर गव्हाणे यांची निवड | रोहकल चे सुपुत्र
परंडा येथे संगणक परिचालक संघटना पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
ROHKAL | वार्ताहर
संगणक परिचालक संघटना अध्यक्षपदी चोपडे
परंडा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या तालुका संगणक परिचालक संघटनेच्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी गणेश चोपडे, उपाध्यक्षापदी आरती काळे व सागर गव्हाणे, तर सचिवपदी रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे माजी अध्यक्ष विश्वास गुडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रत्येक सर्कलला एक सर्कलप्रमुख नेमण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे व राज्य कोअर कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यभर सदस्य नोंदणी करण्यात येत असल्याचे सांगत
उपस्थित सर्व संगणक परिचालकांचे सदस्य नोंदणी फॉर्मही भरून घेण्यात आले. बैठकीस विकास हगारे, गणेश चोपडे, आरती काळे, सागर गव्हाणे, सुशील कुंभार, रावसाहेब काळे, विनोद झिरपे, बालाजी दौंड, कांतीलाल जगताप, युवराज ढोरे, शौकत पठाण, चेतन जतकर, सागर बुरंगे, गोविंद बोंद्रे, शरद गरड, सज्जन गोडगे, केशव पवार, योगेश नरुटे, नितीन शिंदे, अब्दुल पठाण, नवनाथ डोके, उमेश भागडे, प्रवीण रगडे, अक्षय कोटुळे, राहुल हुके, ज्ञानेश्वर गव्हाणे, कैलाश थोरात, तानाजी थोरात, विष्णू खांडेकर आदी संगणक परिचालक उपस्थित होते.
सागर गव्हाणे हे रोहकल ल सारख्या ग्रामीण भागामधून काम करत आहेत ,अत्यंत विश्वासू चिकाटीचे कार्यकर्ते असल्याचे संपूर्ण तालुक्यातून चर्चा असल्याचे सांगितले जाते श्री गव्हाणे यांच्या निवडीमुळे संघटनेला आणखी बळ येणार व त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की संगणक परिचालकांचे प्रश्न सरकार दरबारी लावून धरणार व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबंध राहणार आहोत. तालुका परिसरातून सर्व निवडी झालेल्या सदस्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे.