भारतातील शेतकरी आणि शेतीच्या लुटीचे सुत्र शोधणारे संशोधनात्मक पुस्तक “भांडवलशाहीचे भक्ष: शेतकरी आणि कामगार”लेखक चंद्रशेखर नलवडे पाटील यांच्या
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता तनपुरे महाराज मठ, पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित केला आहे.
भारताचे शेतकरी नेते माननीय राकेशजी टिकैत, आदरणीय माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सर आणि साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक, जेष्ठ पत्रकार नाट्यकर्मी लेखक सन्माननीय ज्ञानेशजी महाराव कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभत आहेत. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांगोला कृषी अधिकारी माननीय श्रीकांतजी शिंदे, हवेली तालुका कृषी अधिकारी माननीय गजानन नारकर आहेत.
सदरचा कार्यक्रम मावळा युवा महासंघ महाराष्ट्र आयोजित करीत आहे,
जिल्हा निमंत्रक समितीचे सदस्य महारुद्र जाधव अध्यक्ष सुरत चेन्नई एक्स्प्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती,यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय या शब्दांमध्ये विषयावरती तोडगा काढण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी राकेश टिकेत यांच्या मार्गदर्शनासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहण्याचे पत्रकार परिषदेतआवाहन केले आहे..
आपला विनीत,
महारुद्र जाधव,
अध्यक्ष सुरत चेन्नई एक्स्प्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती
9588600654