*परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रिपाइंची मागणी.*
अकलूज दि.१२ (प्रतिनिधी)
परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर तसेच या प्रकरणातील सूत्रधाराचा शोध लावून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याने महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.संविधान प्रतिकृतीचा अवमान करणे ही घटना अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर व आरोपीवर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.अशी मागणी आरपीआय आठवले यांच्या वतीने महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अकलूज प्रांताधिकारी यांच्या मार्फत परभणीच्या घटनेचा निषेध नोंदवून करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जि.उपाध्यक्ष एस.एम. गायकवाड, जिल्हा सचिव रमेश धाईंजे,तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे,शाहीर राजेंद्र कांबळे, आबा बनसोडे, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवा तालुकाध्यक्ष दशरथ नवगिरे,अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे,युवक सरचिटणीस प्रवीण साळवे,भास्कर बनसोडे, बापूसाहेब पोळके,महेंद्र लोंढे,संतोष चंदनशिवे,महादेव गायकवाड,संतोष कांबळे,दिलीप सरतापे,प्रकाश गायकवाड, दादासाहेब सरतापे,गौतम भंडारे, राजेंद्र जाधव,मारुती शिंदे,सुनील ओवाळ,प्रकाश कांबळे,गणेश सावंत,अभिजीत वाघमारे, स्वप्निल सरवदे,पंकज भोसले, प्रशांत साळवे,प्रवीण देठे,राहुल सातपुते,प्रदीप लोंढे,राहुल गायकवाड,रोहन लोंढे,भगवान भोसले,हरिभाऊ साळवे, रामभाऊ बनसोडे,नितीन कांबळे,नितीन जाधव,प्रेम सरतापे,बाळासाहेब धाईंजे,राजू खरात,नयुम सय्यद,निखल शिरसट,रवि माने,सतिश गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
सदरच्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाआहे.
****