चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२५ , मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी – ज्येष्ठ कवयित्री प्रा . अलका सपकाळ यांची फेरनिवड |  ९ जिल्ह्यातुन १७५०  किलोमीटर प्रवास करणार आहे. | प्रबोधन | समाज जागृती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*’ चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२५ , मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी – ज्येष्ठ कवयित्री प्रा . अलका सपकाळ यांची फेरनिवड*

*महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातून १७५०   किलोमीटर वारीचा प्रवास राहणार असून, समता विचार सांगणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.*


  ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ २०२५ ‘ वर्षीच्या मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षपदी – कवयित्री  प्रा अलका सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. प्रा सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक कवयित्री असुन कृतीशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत .  सपकाळ यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी , कष्टकरी , उपेक्षित , वंचित महिला यांच्या वेदनांना त्या शब्दरुप देत समाजासमोर घेउन आल्यात , बंधुता अन  समन्वयवादी विचारांच्या पुरस्कर्त्या असलेल्या सपकाळ यांना संत साहित्यातही विशेष रुची आहे . गतवर्षीच्या समता वारी संयोजन समिती अध्यक्ष म्हणून सपकाळ यांची निवड संत चोखामेळा अध्यासन केंद्राकडून करण्यात आली होती , यावर्षी देखील त्यांचीच फेरनिवड करण्यात आलेली आहे .
अध्यक्षा : प्रा .अलका सपकाळ
कार्यवाह – प्रा . डॉ . राजेंद्र थोरात
              – प्रा .  विनोद ठाकरे
उपाध्यक्ष – प्रा डॉ . कविता मुरूमकर
                  प्रा.डॉ . सहदेव रसाळ
                 कोषाध्यक्ष – प्रा देवीदास बिनवडे
                                    महारुद्र जाधव
सदस्य – शरद गायकवाड , फुलचंद नागटिळक , विजयराव जगदाळे , शंकरराव खामकर , ज्ञानेश्वर वाघ , प्रा .राजश्री तावरे , विनायकराव राऊत , भीमराव चाटे , संजयराजे जाधवराव , adv रोहीत मुंडे , आशिष यादव

विशेष निमंत्रित सदस्य – प्रा संतोष तांबे , प्रा डॉ. संदीप सांगळे, जयराज शेंबडे , महादेव वारे , सतीश दत्तू ,

संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन आयोजित समता वारीचे हे ७ वे वर्षे असुन, बुधवार १ जानेवारी २०२५ श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून रविवार १२ जानेवारी २०२५ रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय जन्मभूमी देहुगाव येथे सदरील समता वारीचा समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव , लातूर ,बीड, संभाजीनगर , जालना , बुलढाणा, अहिल्यानगर, पुणे आदी  ९ जिल्ह्यातुन १७५०  किलोमीटर प्रवास करणार आहे. समाजातील वाढत जाणारी दरी, विषमता,जातीयवाद, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयांवर सकारात्मक प्रबोधन करत समाज जागृती करण्यात येणार आहे.वारकरी संतांनी सांगितलेल्या समता ,  बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे . माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होउन  समाजात बंधुभाव वाढीस लागावा यासाठी व समता, मानवता व बंधुभावाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यत पोहचण्यासाठी ही वारी निघत आहे.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र यांच्या वतीने मागील ६  वर्षांपासून ‘ चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . महाराष्ट्रातील ९  जिल्ह्यातून १७२० किलोमीटर प्रवास करत  प्रतिवर्षी १ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान शाळा , महाविद्यालय, वाड्या वस्ती , गाव ,  शहर या ठिकाणी जाऊन समाजात बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी प्रबोधन केले जाते . वारकरी संतानी सांगितलेल्या समता , मानवता आणि  बंधुभाव या मूल्यांचा जागर केला जातो . समाजातील जातीय – धार्मिक विद्वेषी दरी कमी होउन , आपापसात बंधुभाव वाढावा हा समता वारी आयोजन मागील मुख्य उद्देश आहे . एकसंघ समाज हा राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे . जात ,पंथ ,धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत . हा विचार घेऊ  सामाजिक एकतेसाठी चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची चे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते .माणसाची मन जोडण्यासाठी निघालेल्या , दुरदर्शी -सर्वस्पर्शी व्यापक लोकहिताचा विचार घेउन तुमच्या गाव शिवार , वाड्या वस्ती , शाळा महाविद्यालयात , शहरात येत असलेल्या समाजहिताच्या या वारीत सहभागी होत वारकरी संत अन महापुरुषांच्या विचारांच्या वाटेवरुन आपण ही मार्गस्थ होउया…. सदर माहिती सचिन पाटील संस्थापक – निमंत्रक , चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची .संत चोखामेळा अध्यासन केंद्र, यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार