बार्शी. प्रतिनिधी
” मानवी जीवनातील वास्तव, जगण्याचे तत्वज्ञान आणि माणसांचे नाटकीपण यांचा सुरेख संगम जेष्ठ कवी, लेखक श्री. प्रकाश गव्हाणे यांनी ” ही जात माणसांची ” या चारोळी संग्रह पुस्तकात मार्मिक पणे रेखाटली आहे ” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक श्री. अंकुश गाजरे यांनी या काव्य संग्रह प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी चे अध्यक्ष श्री.पां. न. निपाणीकर होते.
व्यासपीठावर कवी प्रकाश गव्हाणे, कवी इकारे, ऍड. सतीश सातपुते,समीक्षक श्री. बी. आर. देशमुख, जेष्ठ लेखक श्री. आबासाहेब घावटे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. गाजरे म्हणाले की, ” श्री. कवी प्रकाश गव्हाणे हे
मान्यवर कवी लेखक आहेत, त्यांचे लेखणात जीवनानुभव, तत्वप्रणाली, प्रत्तीभासंपनता आणि कल्पकता आहे.
प्रस्तुत काव्य संग्रह हा आचार -विचार यांना दिशा देणारा नक्कीच ठरेल “
या कार्यक्रम चे जोडीने श्री. गव्हाणे परिवार संचलित ईश्वरी अभ्यासकी चा नवावा वर्धापन दिन मोठ्ठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले
कार्यक्रम चे प्रास्ताविक सौ. अंजली गव्हाणे यांनी केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यानीं अभ्यासिका मार्फत दिल्या जाणाऱ्या मूलभूत सोईसुविधाचा आढावा घेतला, आतापर्यंत नऊसे विध्यार्थ्यांना शासनाच्या विविध पदी नियुक्ती मिळाल्या आहेत हे आवर्जून अभिमानाने सांगितले.
कु. ईश्वरी गव्हाणे हिने अभ्यासकीचे मूल्यमापन केले.
या वर्षात विविध पदी नियुक्ती मिळालेल्या 29 जणांचा ट्रॉफी व गुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम मध्ये श्री. रामचंद्र इकारे,
ऍड. श्री. सतीश सातपुते, श्री. निपाणीकर यांची प्रेरणात्मक भाषणे झाली.
कार्यक्रम साठी जेष्ठ कवी, श्री. दत्ता गोसावी, कवी अशोक मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रकाशक श्री. राहुल भालके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम चे सुंदर सूत्रसंचालन श्री. किरण विभुते यांनी केले.
सर्वांचे आभार कवी प्रकाश गव्हाणे यांनी मानले.
हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. बालाजी गव्हाणे, सौ. अंजली गव्हाणे, सौ. रंजना गव्हाणे, श्री. गणेश गव्हाणे, सौ.जागृती गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.
गव्हाणे परिवाराकडून सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.