मराठवाडा
वर्षभरात मराठवाड्यात तब्बल ९४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सर्वाधिक २०५ आत्महत्या बीड जिल्ह्यात
नळदुर्ग : शेतकरी
बीड नांदेड पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातील आत्महत्येचे सत्र चालूच आहे या आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे याचे कारण शोधले पाहिजे जिल्ह्यामध्ये भूसंपादन तसेच राजकीय अंदाधुंदी प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत अनेक योजनेपासून शेतकरी वंचित आहेत याची एकमेव कारण हे आहे जिल्ह्यातील राजकारण आत्महत्या च्या विषयाशी बोलताना नळदुर्ग अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिलीप जोशी यांनी भूमी राशी गॅजेटशी बोलताना वरील प्रमाणे सांगितले
आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न तोकडे असल्याने असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम आहे. विविध कारणांनी गेल्या बारा महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सर्वाधिक २०५ आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणिते, अशा या चक्रात शेतकरी सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४
शेतकरी आत्महत्या
(१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ अखेर)
महिने आत्महत्येच्या घटना (सख्या)
झाली आहे. तर सर्वाधिक १०९ आत्महत्या डिसेंबर महिन्यांत झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पिकांचे नुकसान झाले. नुकसान अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील निम्या भरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर चार महिन्यांत शेतकरी आत्महत्येची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
या बारा महिन्यांत मराठवाड्यात तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविला आहे. बीड जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद
९४८ पैकी ५८५ शेतकरी कुटुंबिय मदतीसाठी पत्रा ठरविण्यात आले आहे. ६० प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले.
तर ३०३ प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरविलेल्या कुटुंबियांना ३ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये मदतीचे वाटपही झाले असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.
तर सर्वाधिक १०९ आत्महत्या डिसेंबर महिन्यांत झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पिकांचे नुकसान झाले. नुकसान अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील निम्या भरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे ऑगस्ट ते डिसेंबर चार महिन्यांत शेतकरी आत्महत्येची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.
=======================================
आत्महते ची कारणे शोधा ,भ्रष्टाचार ही त्याची मूळ आहे जिल्ह्यामध्ये भूसंपादन प्रक्रिया चालू असताना सुरत चेन्नई तसेच विविध भूसंपादन होत असताना शेतकरी यांच्या हातून जमीन हिसकावून घेतले जाते त्याच पैशांमध्ये त्यांना दुसरी जमीन येत नाहीत शेतकरी कामगार होत चाललेला आहे प्रत्येक घरामध्ये बेरोजगार तरुण आहे यामुळे आत्महत्या होणारच
-महारुद्र जाधव सुरज चेन्नई एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती
=======================================