संपर्क करा |शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जेमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!

  संपादकीय |

महाराष्ट्र मध्ये 28 जानेवारी रोजी सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवेचे बहुतेक ठिकाणचे भूसंपादन झालेले नसले तरीही, टेंडर प्रक्रिया होणार आहे त्यामुळे भूसंपादित “थ्रीडी “नुसार झालेल्या जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यातून कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा काळा दिवस असणारे यासाठी शेतकऱ्यांनी अनेक विविध बातम्यांवर विसंबून असणारे शेतकरी पुरते फसले जाणार आहेत

कारण शेतकऱ्यांना सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे मध्ये पोत्याने पैसे मिळणार आहेत सोन्याचे दिवस येणार आहेत या बातम्या ची ताकद आणखी तरी संपलेली नव्हती परंतु मागील काही दिवस पाहता अक्कलकोट बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेली पैसे आणि स्थानिक बाजारातील बाजार भाव पाहता शेतकऱ्यांना सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे मधून येणाऱ्या पैशांमध्ये गेलेल्या जमीनी एवढी ही घेता येत नाही कायद्यामध्ये खूप मोठा गाजावाजा झाला होता बाजार भावाच्या चारपट रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही रेडीरेकनरच्या दरानुसार शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी नाराज आणि हवालदिल आहेत पैसे उचललेले नाहीत परंतु शेतकऱ्यांनी कोर्टाचा मार्ग धरण्यासाठी खऱ्या अर्थाने जाणीव जागृती झालेली नाही धाराशिव बीड आणि नगर जिल्ह्यातील शेतकरी काही प्रमाणामध्ये साधारण दोन टक्के शेतकरी कोर्टात गेलेले आहेत 98% शेतकऱ्यांची जमीन अशीच वरुबडली जाण्याची शक्यता दाट आहे यासाठी शेतकरी जरी कोट्याधीश असेल खूप मोठा मालक असेल तरी आपल्या

आईसाठी त्याला कोर्टात जाण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये त्याच्याकडे नाहीत असे नाही का? परंतु मन छोटे केल्यामुळे शेतकरी खर्च करण्यास तयार नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचे जे कायदेशीर अधिकार होते ते टेंडर झाल्याने तेही संपुष्टात येणार आहेत

प्रत्यक्षात म्हणजे भूसंपादन प्रक्रिया चालू असल्यापासून अनेक शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेतलेले नाहीत आक्षेप घेतलेले नसताना प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वहिवाटी सरकारने केलेले मोजमाप जिरायत बागायत पाईपलाईन झाडांचे वय वंझाडे फळझाडे तलाव यांचे प्रश्न अनुत्तरीत असतानाही बोगस भूसंपादन झाल्याचे अनेक अर्ज देऊनी काही फायदा झालेला नाही तरी शासनाने बेकायदेशीरपणे धामटून ही भूसंपादन प्रक्रिया तशीच पुढे नेल्याची दिसून येत आहे तरी ह्या झालेल्या प्रक्रिये वरती येणाऱ्या इलेक्शनमध्ये नेते काहीतरी करतील असा शेतकऱ्यांचा अंदाज होता तो पण फोन ठरलेला आहे त्यामुळे आता पैसेही जाणार आणि जमिनी जाणार असे चित्र सध्यातरी निर्माण झालेले आहे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे एकच आहे की शेतकऱ्यांनी काही झाले तरी भूसंपादनामध्ये कोर्टाची पायरी चढायला हवी ….आपापल्या शक्ती खर्च करायला हवे कारण आपण आपल्या जमिनीचे रक्षण करायला हवे… आपली काळी आईची सेवा करण्याची संधी आपण सोडायला नको…

कमीत कमी जे आपल्याला कोर्टाने दिलेल्या अधिकार आणि जमिनीचे मालक म्हणून असणारे अधिकार याबाबत ही शेतकरी जागृत नसल्याचा दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या पुढील काळात अडचणीला सामोरे जावे लागणार आहेत.

शेवटची संधी म्हणून सुरेश चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे की आता तरी कोर्टात या त्यामुळे तुम्हाला पुढील संकटाचा सामना कारण करावयाचा ठळेल आणि सर्वांबरोबर संघटितपणे काम केल्यास आपणाला हीच न्याय मिळू शकतो कोर्टामध्ये संघटितपणे गेल्यास चांगला न्याय भूसंपादनात मिळू शकतो एकटा व्यक्ती कोर्टात म्हणजे हायकोर्टामध्ये जाणे शक्य नाही हाय कोर्टातला खर्च पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना उचलले ते शक्य नाही .

त्यासाठी तुळजापूर परंडा, जामखेड ,अष्ठी, नगर राहुरी संगमनेर येथील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की शेवटची संधी सोडू नये कारण टेंडर होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी कोर्टात जाणे गरजेचे आहे नाहीतर तुमची जमीन

बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावली जाईल. कारण शेतकऱ्याच्या जमिनीवरती जेव्हा काम चालू होते त्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त कोर्टामध्ये जर तुम्ही असाल तरच तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही . यासाठी शेतकऱ्यांनी कोर्टात जाणे फार गरजेचे आहे.

कोर्टात जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सातबारा आधार कार्ड व शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतलेले आक्षेप एवढीच कागदपत्रे आवश्यक आहेत

महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील शेतकऱ्या ंचा रहिवास असू द्या संघटितपणे शेवटची याचिका दाखल करायची आहे तरी शेतकऱ्यांनी सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीकडे संपर्क करावा संपर्क क्रमांक  9588600654

Leave a Comment

और पढ़ें

संपर्क करा |शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!

धाराशिव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर |वर्षभरात मराठवाड्यात तब्बल ९४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक २०५ आत्महत्या बीड |…तर आत्महत्या होणारच… भूसंपादन ?-महारुद्र जाधव सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

संपर्क करा |शेतकऱ्यांनो काळी आई गेली ….आत्ता जमिनी खंदणार | नाहीतर जमिनी ही फुकटात जाणार | शेवटची संधी | 28 जानेवारी नंतर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक दिवस घातक | कोणाकडे दाद मागणार तुमच्या हातात कागद नाही ….. हायकोर्ट हाच एकमेव पर्याय..!!