ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना केले संबोधित
पुणे : युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना संबोधित केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे ; यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. मोदीजींनी कौशल्य आधारित शिक्षणावर सर्वाधिक भर दिला आहे. त्यामुळे आज जर्मनी सारखा देश भारताकडे कुशल मनुष्यबळाची मागणी करत आहे. स्टार्ट अप मध्ये भारताने दैदिप्यमान कामगिरी केली आहे, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
या परिषदेत अमेरिका, युनाटेड किंग्डम, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच जगभरातील विविध देशांमधून उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुमारे 500 व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक तसेच गर्जे ग्लोबल संस्थेमार्फत परदेशातील शंभराहून अधिक व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर सहभागी झाले आहेत.