रोहकल वार्ताहर |
भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार सिंगेला पोहोचला असताना शेतकऱ्याच्या विकासामधील मूळ अडसर म्हणजे सीना कोळेगाव धरणाचे पाणी साकत प्रकल्पामध्ये जर पडले तर अनेक शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण होणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल चालू असताना एक महिनाभर खपून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कॅनॉल मध्ये पाणी सोडण्याचे काम,अनेक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येत आहे त्यासाठी कमालीचे प्रयत्नही सावंत साहेबांकडूनही झालेली होते परंतु अचानक सेना कोळेगावचे पाणी रोहकल मार्गे साकत प्रकल्प मध्ये सोडण्यात आले आणि सोडल्यानंतर सदर पाणी बंद करण्याचे काम गैरमार्गाने झालेले दिसून आले,द्वेष व कपटी भावनेने शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत आहे म्हणून सदर पाणी अडवण्याचा घाट या प्रकरणांमध्ये झालेला दिसून आला त्यामुळे एक महिनाभर शेतकऱ्यांनी विशेष असे काम करून अचानक पाणी कुणाच्या सूचनेवरून अडवले गेले ….??
अशी चर्चा आणि प्रचाराच्या काळात घडत गेली त्यातच भरीला भर म्हणून आणि अफवांचे जरी पीक असले तरी माजी आमदारांकडून मोटे या विषयासाठी विशेष अशी काही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत अशी शेतकऱ्या ंमध्ये चर्चा होती,
“माजी आमदार राहुल मोटे यांच्याकडून पाणी अडवण्याचीच प्रयत्न झाले, उलट अधिकाऱ्याला फोन करून दम दिला की सस्पेंड करीन पाणी सोडले तर त्यामुळे आसपासचे सर्व शेतकरी चिडले”
– माजी सरपंच ,गिरीधर कोलते
ज्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास सहमती दिली त्याच शेतकऱ्यांना आडवयला लावण्याची भर कोणी घातली ? माजी सरपंच गिरीधर कोणते रोहकल यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्या कृत्यांचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की माजी आमदार राहुल मोटे यांनी पाणी अडवण्याचीच प्रयत्न केले, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
या प्रकरणी शेतकऱ्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्या विरोधात निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की माजी आमदार राहुल मोटे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या समस्या वाढवण्याचे काम केले आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे उमेदवार दुर्लक्ष करत आहेत, ही शेतकऱ्यांची मुख्य तक्रार आहे.
शेतकऱ्यांना वाटते की उमेदवार ह्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि ते उमेदवारांवर विश्वास ठेवत नव्हते.
सदर आणि प्रश्नावरती मी नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा मांडला चालू झालेले पाणी बंद का झाले यावर अनेक वेळा आवाज उठवला गाव लेवलवरही मीटिंगमध्ये प्रश्न मांडला परंतु यामध्ये समाधानकारक असे उत्तर मिळत नव्हते
– मधुकर जाधव शेतकरी रोहकल
शेती साठी पाणी ,हेच एकमेव कारण आमदार डॉक्टर सावंतां चे विजयाचे असे शेतकऱ्यांनी सांगितले आणि मतदान केंद्रामधून हे दाखवून दिले.
“गावकऱ्याची भीती गेली लवकरच कॅनॉलमध्ये पाणी सुटणार”
_माजी सरपंच तानाजी कोलते
वरीलपैकी काही कारण असेल तरी भूम परंडा वाशी मध्ये झालेला पराभव हा कार्यकर्त्यांचा पराभव आहे नेत्यांचा पराभव नाही …असे कारण राष्ट्रवादीचे हनुमंत कोलते पाटील यांनी सांगितले.