आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रहार आणि प्रयास फाउंडेशनची मागणी.
प्रतिनिधी :-आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची व्याप्ती वाढवण्या संधर्भात प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके प्रयास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष बापू नलवडे , प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल जी केसरे यांच्या कडून निवेदन देण्यात आले. मराठा समाजातील तरुण उद्योगात उतरावे म्हणून आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा देण्यासंदर्भात ही योजना सुरू केली गेली असली. तरी देखील म्हणावे तसे या योजनेची व्याप्ती ग्रामीण भागात वाढलेले दिसून येत नाही. ग्रामीण भागात आता पर्यंत फक्त ट्रॅक्टर योजनेचा जास्तीचा लाभ घेतलेला दिसून येत आहे. बाकीच्या व्यवसायात बँकांची कर्ज देण्याच्या संदर्भात दिसून येत असलेले अनास्था यामुळे या योजनेपासून बरेच तरुण वंचित राहिलेले दिसून येत आहेत. त्यामुळे प्रहार आणि प्रयास फाँडेशन चे वतीने तालुका स्तरीय समिती स्थापन करून तरुणाच्या येणाऱ्या अडचणी सोडवून विविध उद्योगाला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र जी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून मेळावे घेण्याच्या विनंतीला ही सहमती देत माढा तालुक्यात लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्याचे आश्वासन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, प्रयास फोंडेशन चे संस्थापक अध्यक्ष बापू साहेब नलवडे, प्रहार तालुका अध्यक्ष अमोल केसरे, संतोष कोळी , पंकज चव्हाण उपस्थित होते.