*तीर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा रायगड यांच्या वतीने अकलूज,येथे श्रीगणेश निर्माल्य संकलन.*
आज मंगळवार दिनांक17/09/2024 रोजी, डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, तालुका- अलिबाग, जिल्हा- रायगड यांचे सौजन्याने
आदरणीय डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे श्री अनंत चतुर्दशी दिवशी घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या श्रीगणेश मूर्ती पुढील निर्माल्य (हार, फुले, दुर्वा, फळे, ई.)संकलन करून व त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री दयानंद गोरे साहेब मुख्याधिकारी नगरपरिषद अकलूज यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर उपक्रमास प्रतिष्ठानच्या श्री बैठक अकलूज, टेंभुर्णी, चाकोरे, वेळापूर, बोरगाव, महाळुंग, नेवरे, करोळे, मळोली येथील 236 श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केले.
अकलूज व परिसरातील घरगुती 5949 व सार्वजनिक मंडळाचे 157 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सुमारे 7720 किलो ग्रॅम निर्माल्य संकलन करण्यात आले.
आज पर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, प्रौढ साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, बस स्टॉप निवारा, जलाशय स्वच्छता, बोअर व विहीर पुनर्भरण, श्रवण यंत्रांचे वाटप, शालेय वह्या- पुस्तकांचे वाटप कुराण व्यवस्थापन ई.असे विविध उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविरत चालू आहेत.
तसेच प्रतिष्ठान मार्फत मरवडे, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथे सुद्धा निर्मल्य संकलनाचे कार्य संपन्न झाले.