*संगम येथे प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती युवा सेनेच्या वतीने साजरी* तर
वार्ताहार :
प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती युवा सेना जिल्ह्या जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने संगम येथे साजरी करण्यात आली. प्रबोधनकार केशव ठाकरे यांचे कार्य व त्यांचे विचार यांचे स्मरणही या निमित्ताने करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या विचारधारेच्या माध्यमातून व विचारसरणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे अलौकिक आणि मोठे असे कार्य केले होते .प्रबोधनकार ठाकरे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील .ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा हिंदुरुदय सम्राट आणि कणखर असा नेता महाराष्ट्राला आणी देशाला दिला. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या काळामध्ये अनेक पुस्तके लिहिली .पुस्तके व वर्तमानपत्रे यांमध्ये लिखाण करून त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात खऱ्या अर्थाने जनाक्रोश उभारण्याचे काम केले. या जनाक्रोशाच्या माध्यमातून अनेकांना गुडघे टेकायला भाग पाडणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रबोधनकार ठाकरे होय. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र व प्रबोधनकारांचे नातू आदरणीय उद्धवजी ठाकरे चालवत आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करीत असताना प्रशांत पराडे संजय पराडे नितीन इंगळे विकास भोई सचिन ताटे काका इंगळे सिदू गायकवाड काका भोई आदित्य इंगळे इ शिवसैनिक आणि युवा सैनिक उपस्थित होते.