संत चोखामेळा महाराज यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी संजीवन समाधी दिन निमित्ताने आयोजित संत चोखामेळा समता समता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वारकरी संप्रदायाच्या समाजहितैशी मूल्यांचे संत चोखामेळा समता पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वाच्या कार्यात दर्शन घडते — ह.भ.प.दिपकजी महाराज तेर

संत चोखामेळा महाराज यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी संजीवन समाधी दिन निमित्ताने आयोजित संत चोखामेळा समता समता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न….



पुणे : भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाने पंढरपूर च्या वाळवंटात सर्व समाज घटकातील संताना एकत्र आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना करत समता, बंधुता व मानवता या मूल्यांची अनमोल भेट समाजाला दिली. वारकरी संप्रदायाच्या याच समाजहितैशी मूल्यांचे संत चोखामेळा समता पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वाच्या कार्यात दर्शन घडते आहे .असे प्रतिपादन सकल संत चरित्र कथाकार , संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह भ प दीपकजी महाराज तेर यांनी केले .संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने संत चोखामेळा महाराज यांच्या ६८६ व्या पुण्यतिथी संजीवन समाधी दिन निमित्ताने आयोजित संत चोखामेळा समता समता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते .
वारकरी संतांनी कृतीशील आचरणाद्वारे सांगितलेल्या सामाजिक एकता , बंधुभाव अन मानवतावादी मूल्यांना केंद्रस्थानी मानून सामाजिक एकतेसाठी अविरतपणे  कार्यरत असलेले संत चोखामेळा महाराज जन्मभूमी मेहुणाराजा जि बुलढाणा येथील संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे प्रणेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा ) व संत विचारांचा  जागर आधुनिक माध्यमाद्वारे अधिक समर्थपणे करणारे लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार महंत ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील (आळंदी )  यांना संत चोखामेळा समता पुरस्कार देउन ह भ प दिपकजी महाराज यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,शाल , पुष्पगुच्छ , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले , पुणे विद्यापीठ पुणे च्या संत ज्ञानदेव , संत नामदेव व संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रो .डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक होते . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणजे ज्येष्ठ विचारवंत , माजी खासदार  प्रो .डॉ. सुनीलराव गायकवाड , किमान वेतन सल्लागार मंडळ , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , कामगार नेते  डॉ. रघुनाथराव कुचिक उपस्थित होते . उद्योजक अण्णासाहेब वावरे , साहित्यिक श्यामसुंदर मुळे , शेषराव चाटे ,दत्तात्रेय शिंदे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते .

ज्येष्ठ गांधीवादी आ.हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना त्यांच्याच संकल्पनेतुन संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याची बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या वतीने मेहुणाराजा येथे सुरुवात झाली , यास यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. सपकाळ यांनी आत्यंतिक श्रद्धेने सुरु केलेला जन्मोत्सव सोहळा आज मोठया प्रमाणात साजरा होतो. प्रतीवर्षी राज्यातील चोखामेळा भक्त , अभ्यासक संशोधक या सोहळ्यास हजेरी लावतात , संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळा सोबतच संत चोखामेळा महाराज व कुटूंबातील अन्य संतांच्या  विचार संवर्धन उत्कर्ष कार्यात सपकाळ सक्रिय असतात त्यांच्या संत चोखामेळा यांच्या विचार प्रसार कार्याबद्दल त्यांना  संत चोखामेळा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यातआले .
    सोबतच  वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार ह भ प श्री महंत पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर  हे आधुनिक माध्यमाद्वारे वारकरी विचारांचा सातत्याने प्रचार प्रसार  करत असतात , तरुण पिढीस समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील मांडणीद्वारे ते संत विचार घेउन प्रबोधन करत आहेत .संत चोखामेळा समता पुरस्कार देउन ह भ प पुरुषोत्तम पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले . पाटील महाराज हे आळंदी येथील श्री सद्गुरु अमृता स्वामी मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत तसेच झी टॉकीज वरील कीर्तन मालिका गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा व मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार आहेत . ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील यांना आध्यात्मिक तर आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांना सामाजिक गटातून संत चोखामेळा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत चोखामेळा अध्यासनाचे संस्थापक सचिन पाटील यांनी तर आभार ह भ प वसंतराव आण्णा पवार महाराज यांनी तर निवेदन ज्येष्ठ विश्वस्त ह भ प प्रसाद माटे महाराज यांनी केले .
      वारकरी संतांनी सांगितलेल्या मार्गाने जनसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे गढून गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या गौरव सोहळ्यास मुंबई , पुणे , सोलापूर , बुलढाणा ,सातारा , धाराशिव लातूर आदी जिल्ह्यातून संत चोखामेळा प्रेमी उपस्थित होते .


-……………………………………………………………..
विशेष सन्मान  …

संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या मुख्य विश्वस्त मंडळावर विश्वस्त म्हणून निवडझाल्याबद्दल श्रीमती  ए डी राऊत – सुरवसे ( कळंब जि धाराशिव ) धोंडप्पा नंदे ( अक्कलकोट जि सोलापूर )  हरीश भोसले ( सातारा ) यांचा अध्यासनाचे ज्येष्ठ विश्वस्त ह भ प प्रसाद महाराज माटे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

……………………………………….

Leave a Comment

और पढ़ें

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार

सोनारी – साकत रोड बोगस काम   | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास  | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles

१६ व्या छ. संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन |छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी – शरद गोरे |उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक
श्रीपाल सबनीस, उद्घाटक सुप्रसिध्द इतिहास संशोधक शरद गोरे,स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, निमंत्रक सुर्यकांत नामगुडे, फुलचंद नागटिळक

सोलापूर| NHAI ने प्रकल्पाचे काम सुरू… |संमतीशिवाय सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेसाठी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप ? शेतकरी शेतकरी संभ्रमात. |ताबा न देताशेतकऱ्यांनी कोर्टात जावे एवढाच पर्याय – समिती

💥💥ब्रेकिंग💥💥|महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या हातांना प्रबोधन युवाशक्ती बळ देणार – डॉक्टर कुचिक 💥प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्राच्या वतीने उत्कृष्ट योगदानासाठी ६० व्यक्तींचा गौरव पुरस्कार