पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडोर महामार्ग च्या बाबतीमध्ये सदर पट्ट्यामध्ये रोड होणार म्हणून भूसंपादनाच्या आधी सूचना मार्चमध्येच सरकारने वेब पोर्टल वरती काढली होती ,
सदर अधिसूचना पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी खडबडून जागे झाले प्रत्येक गावामध्ये सदर आधी सूचनेची व गावातील भूसंपादनामध्ये जाणाऱ्या शेती बद्दल शेतकरी चर्चा करू लागले आणि गावांमध्ये या संदर्भामध्ये सकारात्मक नकारात्मक बैठकही पार पडल्या, सदर बैठकावून पार पडल्यानंतर अनेक गावचे शेतकरी शेतीला दर काय मिळणार म्हणून सोशल मीडिया वरती चर्चा सुरू झाली त्यातून कायदेशीर मिळणारा मावेजा याबद्दल शेतकऱ्यांनी माहिती करून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या जमिनीला रेडी रेकणर च्या पाचपट बाजार भाव मिळणार आहे महाराष्ट्र शासन समृद्धी महामार्गाच्या धरतीवरती थेट वाटाघाटीच्या भूसंपादनाने करणार आहे …
..”असेही प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये शेतकऱ्यांना ऐकायला मिळाले परंतु प्रत्यक्षात जमिनीला मिळणारे पैसे हे बाजारभावाच्या दहा ते वीस टक्के असे” पैसे काही भागांमध्ये मिळता येत असे चित्र निर्माण झाले त्यामध्ये नाराज होऊन शेतकऱ्यांना असे वाटले की जमीन गेल्यानंतर जमिनीला जमीन ही आपल्याला मिळू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे त्यावर एकत्रित येऊन शेतकऱ्यांनी उपाय म्हणजे आपणास कमी पैसे मिळत आहेत म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी आपली समस्या नेतेमंडळींच्या कानावरती घातली व आपला रोज हा भूसंपादनातील मिळणाऱ्या रकमेला आहे असे आपल्या तक्रारी अर्जामध्ये शेतकऱ्यांनी म्हटलेले आहे.
प्रत्यक्षात परंतु प्रत्यक्षात घडले काय??
सदर भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना खूप कमी बाजार मिळतोय हे शेतकऱ्यांनी नेतेमंडळींना दाखवून दिले आणि सदर रोड बद्दल आम्हाला बाजारभावाच्या पाचपटीने पैसे देऊन अशी एकमेव मागणी तरी अनेक शेतकऱ्यांतून दिसून आलेली आहे.
शेतकऱ्यांची नाराजी रोडला नाही मग ध चा मा कुठे झाला ??
मागील काही वृत्तपत्रातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर असे दिसून येत होते की अनेक शेतकऱ्यांना रोड बद्दल हरकत नाही परंतु हरकत ही फक्त पैशाबद्दल असल्यामुळे शेतकरी भूसंपादनामध्ये पैसे वाढवून द्या
याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे भूमिराशी गॅजेट्स संपर्क साधून सांगण्यात आले की आमचा रोडला विरोध नाही
अनेक तर्क वितर्क व अफवांना फुटले पेवं.
स्थानिक विचारवंतांचे म्हणणे आहे की सदर रोड ची आलायमेन्ट बदलली तर शेतकऱ्यांना होणारा फायदा सोडून यामध्ये भांडवलदार मंडळी शेतकऱ्यांना गप्प ठेवून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरेदी करून नवीन रोडच्या अलाइनमेंट मध्ये घाईघाईने नवीन अलाइनमेंट झाल्यावर त्यातून मिळणारा फायदा हा भांडवलदारांना / जमीन खरेददारांना होऊ शकतो असे काही लोकांचे म्हणणे आहे.
पैसे नको जमिनी वाचवा …
असेही बोलणारा एक शेतकरी वर्गामध्ये गट सक्रिय आहे शेती वरती प्रेम करणारा शेतकरी तुम्ही आम्हाला सोन्याच्या मोहरा जरी दिल्या तरी आम्हाला नको …..”आमची जमीन फ्री आहे” असाही वर्ग सक्रिय आहे त्यावरून आपले माय भूमीवरील प्रेम लक्षात येते जरी ….असे दोन्हीही चर्चा असेल तर येणारा पुढील काळच याचे उत्तर ठरवेल कोणाला किती लाभ मिळतोय त्यापेक्षा भांडवलदारांना किती लाभ आहे याच्यावरती याचे उत्तर ठरणार आहे…!!