Post Views: 25
अकलूज वार्ताहर |
प्रतिनिधी :- प्रेस संपादक व पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा परिषद शाळा देशमुखपट्टा माळशिरस येथे खाऊचे वाटप करून पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने शूटिंग बॉल महाराष्ट्र संघाचे सलग सात वर्ष कॅप्टन असलेले अमिर काझी व जन कल्याण बहुउद्देशीयसंस्थे संस्थापक अध्यक्ष संतोष खंडागळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला या वेळेस शाळेच्या वतीने अमिर काझी संतोष खंडागळे, सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ तांबोळी, सुवर्णा घोरपडे, विष्णू भोगळे, त्रिमुति कन्स्ट्रक्शनचे गणेश फुगे उपस्थित होते. मुख्याध्यापिका नूरजहाँ तांबोळी यांनी आभार मानले