पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी स्वाती धाईंजे तर अकलूज शहर कार्याध्यक्षपदी पुष्पा भडंगे यांची निवड
अकलूज शहर संपर्कप्रमुखपदी इम्रान शेख तालुका कार्यकारणी सदस्यपदी सागर झेंडे
प्रतिनिधी:-
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील निवडी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी जाहीर करून निवडीचे पत्र दिले.
रविवार 29 डिसेंबर 2024 रोजी गणेशनगर अकलूज येथील संपर्क कार्यालयामध्ये या निवडी करण्यात आल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी स्वातीताई धाईंजे अकलूज शहर महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी पुष्पा भडंगे माळशिरस तालुका कार्यकारणी सदस्यपदी सागर झेंडे अकलूज शहर संपर्कप्रमुखपदी इम्रान शेख यांच्या निवडी जाहीर करून महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी त्यांचा सत्कार करून निवडीचे पत्र दिले.निवडीनंतर बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले की पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद अकलूज शहरसह माळशिरस तालुक्यामध्ये वाढवून पक्ष मजबूत करण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पदाचा वापर करून त्यांना न्याय द्यावा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांना मिळालेल्या महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळामार्फत लवकरच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष विश्वास उगाडे तालुका युवक अध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका प्रसिद्धीप्रमुख संदिप तोरणे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे ऋषिकेश गायकवाड पवार आदी यावेळी उपस्थित होते