रब्बी पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यात आठ दिवसात उजनी धरणातून पाणी नाही सोडले तर धरणावर जलसमाधी घेऊ :गणेश इंगळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रब्बी पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यात आठ दिवसात उजनी धरणातून पाणी नाही सोडले तर धरणावर जलसमाधी घेऊ :गणेश इंगळे

वार्ताहार :
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून उजनी उजव्या कालव्याला व डाव्या कालव्याला रब्बी पिकांसाठी पाणी सोडावे यासाठी युवा सेनेच्या वतीने उजनी उजव्या कालव्या मध्ये धरणे आंदोलन युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने करण्यात आले
उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस माढा पंढरपूर सांगोला मंगळवेढा मोहोळ अक्कलकोट अशा अनेक तालुक्यातील  शेती ही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे .सध्या उजनी धरणामध्ये 95% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे तरीदेखील येथील मिळणारं जे कालव्यातील  पाणी आहे ते पाणी अजून न सोडल्यामुळे याचा थेट फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसतोय. सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्रा मध्ये सध्या  रब्बी पिक आहे.परंतु  जिल्ह्यामध्ये रब्बी  पिकांना पाणी नसल्या मुळे थेट पिकांना फटका बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणजे आता जर उजनीतून शेतकऱ्यांना पाणी जर सोडायचा असेल एक तर थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश निलगिरीत करावे लागतील .

पालकमंत्री न निवडणे याचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळे उजनीतून येणारे पाणी थांबल आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसतोय. रब्बी पिकांसाठी पाणी तात्काळ सोडावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने उजनी धरणावर आठ दिवसात जलसमाधी घेऊ असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे. यावेळी गणेश काळे भारत पराडे लालासाहेब भोई अशोक भोई माऊली पराडे अवी पराडे ओम पराडे सचिन इंगळे मोनू इंगळे विकास भोई सिदू गायकवाड सोमनाथ भोई आदित्य भोई दीपक भोई अक्षय भोई ई उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे : गेंड्याच्या कातडीला टोचला कोर्टाचा टोचा…प्रशासनाने मागितली 3 आठवड्याची मुदत ,शेतकऱ्याच्या याचिकेचा प्रशासनाला विसर , उच्च न्यायालयात फटकारले |अनेक शेतकरी न्यायालयाच्या वाटेवर – बावडकर

सोलापूर | विद्युत टॉवर : शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर उभारलेले टॉवर याचिका “मुंबई उच्च न्यायालयामध्ये ” लवकरच सुनावणी  |याचिकेमुळे लाखो शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये उभारलेल्या टॉवरचा मावेजा लाखो रुपयात मिळणार…!!

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles