कलाशिक्षक अण्णाराव खंडागळे यांचा गौरव…..
प्रतिनिधी
माढा येथील कलाशिक्षक लिटिल मास्टर इंग्लिश मीडियम स्कूल, शेटफळ. येथे कार्यरत असणारे अण्णाराव नागनाथ खंडागळे यांचा डॉ राजकुमार आडकर आणि परिवाराच्यावतीने आयोजित गुरुजनांचा कृतज्ञता सन्मान आणि डॉ. सुयश आणि डॉ. सृष्टी यांच्या कौतुक सोहळ्याच्या प्रसंगी आमदार अभिजीतआबा पाटील यांच्या शुभहस्ते मानाचा फेटा, स्नेहाची शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कलाशिक्षक अण्णाराव खंडागळे यांना शिक्षण क्षेत्रातील बारा वर्षाच्या अनुभव असून त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. शैक्षणिक व कलाक्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांना अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणूनच त्यांचा सन्मान आडकर परिवाराच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे अभिनंदन माढ्याच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे, संजयबाबा कोकाटे, भारत शिंदे उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, डॉ राजकुमार आडकर डॉ अनिता आडकर, एड. रत्नप्रभाच जगदाळे, प्राचार्या फराह शेख, चेतन कोरके,रवी वसेकर नामदेव खारे ,जयकुमार शिंदे, विद्या महाडिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.