सोनारी – साकत रोड बोगस काम | एक किलो मीटर साठी पावणे ४२ लाख |साईट पट्ट्या साठी पाया नाही | लेवल /रुंदीकरण कडे दुर्लक्ष | खडी दगडाला फक्त डांबराचा वास | सद्यस्थितीचे परीक्षण केल्याशिवाय पुढे काम करू नये ग्रामस्थांची मागणी
रोहकल वार्ताहर |
सोनारी ते साकत व्हाया रोहकल मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेले काही दिवसांपासून चालू असल्याचे दिसून येते सदर काम चालू असल्यापासून अनेक वेळा सदर रस्त्याच्या संदर्भामध्ये चौकशी केली असता बांधकाम खाते यांच्याकडून डी पी आर ची मागणी केली असता टोलवाटोलवी दिसून येते, सदर बांधकामावरील कर्मचारी यांच्याकडे फोन केला असता… त्या संदर्भात माहिती नाही असे सागितले ,
सदर रस्त्याच्या निरीक्षणाच्या संदर्भामध्ये कामाचा दर्जा व कामावरती कॉलिटी कंट्रोल करण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे कर्मचारी आजपर्यंत सदर कामावर फिरकलेची दिसून येत नाही.
सोनारी ते रोहकल मार्गे साकत सदर रस्त्याचे रुंदीकरण व साईड पट्ट्या तसेच डांबरीकरण रस्त्याची उंची वाढवणे, अरुंद असणाऱ्या ठिकाणचे व्यवस्थित डी पी आर नुसार रुंदीकरण करून घेणे रस्त्यावरती जागोजाग फलक बसवणे रस्त्याच्या मधोमध व दोन्ही साईडला वाईट कंट्रोल लाईन पट्टी मारणे , अशा प्रकारचे अशा प्रकारचे कामे होणार असल्याचे समजते परंतु सदर कामाच्या संदर्भामध्ये सदर कामावरील नियुक्ती इंजिनियर पाटील यांनी डी पी आर मला माहिती नसल्याचे सांगितले तसेच, तसेच सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर शिंदे हे दिसून येतात
अत्यंत हीन दर्जाचे रोडचे कामकाज
सदर सोनारी पासून होणारा रस्ता हा स्वतंत्र्यानंतर म्हणजे 75 वर्षानंतर पहिल्यांदाच व्यवस्थित रस्ता होत असल्याचे चित्र सदर अलकावरून दिसून येते परंतु , फलकावरील रस्ता सुधारण्याच्या संदर्भामध्ये एस्टिमेट व डी पी आर नुसार काम होत नसल्याचे चित्र सध्या तरी आहे सदर रस्त्यामध्ये खालील प्रकारच्या कामकाजातील त्रुटी दिसून येत आहे
1)रस्त्याच्या आवश्यक त्या उंचीसाठी(लेवल) भराई केलेली दिसून येत नाही
2) साईड पट्ट्यामध्ये डायरेक्ट मातीवर मुरूम भरल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये (रस्त्याच्या दोन्ही साईट पट्ट्या आवश्यक त्या खोलीवरती घालून त्यामध्ये मुरूम भरून त्याच्यावरती दाबकाम करून घेणे आवश्यक आहे ते झालेले नाही)
3) सीलिंग मध्ये व्यवस्थित डांबरीकरण दिसून येत नाही.
4) अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी जास्त प्रमाणात झालेली आहे
5) अनेक ठिकाणी तात्पुरते फिनिशीग केल्याचे दिसून येत आहे
6) रोहकल गावाच्या लगत डायरेक्टर मुरूम भरल्याचा दिसून येत आहे
7) योग्य त्या पद्धतीने पाण्याच्या उतारा वरती काम नाही
एक किलो मीटर साठी किती खर्च होत आहे?
एकूण रस्ता ११.६०० किमी. एवढ्या अंतराचा असो एकंदरीत सर्व मिळून टेंडर ४ कोटी 83 लाख 76000 हजार एवढ्या रकमेचे असल्याचे सदर बोर्ड वरून दिसून येते, परंतु सदर बोर्ड वरील रक्कम आणि आकडेनुसार सदर क्वालिटीचे काम अथवा दर्जाचे काम दिसून येत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे
एक किलो मीटर साठी होणारा खर्च जर विचार केला तर 41,लाख 70,हजार 344रुपये .82 पैसे एवढा खर्च होत आहे.
बोगस रस्त्यासाठी ग्रामस्थांमधून समिती .
सदर बोगस कामकाज रस्त्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांतर्फे लवकरच समिती नियुक्त होणार असून सदर रस्त्याचे बोगस कामकाज व सध्या चालू असणाऱ्या कामाचे परीक्षण होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय होईल तसेच अनेक ठिकाणी केलेल्या कामाचे चित्र करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद नियुक्त बांधकाम इंजिनियर यांच्यावतीने सदर कामाचे परीक्षण ग्रामस्थांसमोर होणार का अशा प्रकारचे चर्चा सध्या तरी चालू आहे तसेच सदर कामाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत योग्य दर्जाचे काम होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे , अशी चर्चा होत आहे .
सदर कामाच्या संदर्भामध्ये नियुक्त कर्मचारी हांडे व पाटील यांनी अद्यापही डीपीआर संदर्भ मध्ये समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्यामुळे सदर रोडचे काम योग्य गुणवत्तेचे होणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह दिसून येत आहे.
प्रशासनाने दखल न घेतल्यास सदर काम कामावरती कोर्टातून समिती दाद मागणार
कसा होणार रोड याचा लावा बोर्ड
सदर रोडच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये कामकाज करण्याच्या पद्धतीचा डीपीआर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्धी साठी
डखवण्यात यावा तसेच दर्शनी भागावर रोड दर्जाच्या संदर्भामध्ये फलक लावण्यात यावा अशी ही मागणी , सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती यांच्या बद्दल मी करण्यात आली आहे.