उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

अकलूज : ग्रामीण भागात उद्योगांना प्रोत्साहन देऊन नवनवीन व्यवसायातून युवकांना प्रोत्साहन देणार्‍या तसेच समाजसेवेत अनमोल योगदान देणार्‍या उद्योगमहर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या 64 व्या जयंती निमित्त विविध सामाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.

श्री क्षेत्र आनंदी गणेश येथील कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या शक्तीस्थलास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील परिवार व विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरीकांनी अभिवादन केले. यावेळी  सदर कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पं.स.सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शिवरत्न उद्योग समुहाचे चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, बझारच्या माजी अध्यक्षा ईश्वरीदेवी मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील  यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरीक उपस्थित होते.

यावेळी श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने आनंदनगर परिसरातील गरजू विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले तसेच श्रीक्षेत्र आनंदी गणेश परिसरात 150 वृक्षांची लागवड करण्यात आली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अकलूज-माळेवाडी परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकिर्ती युवा मंचच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. यामध्ये 2200 विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षकांचा सहभाग होता.

Leave a Comment

और पढ़ें

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी स्वाती धाईंजे तर अकलूज शहर कार्याध्यक्षपदी पुष्पा भडंगे यांची निवड
अकलूज शहर संपर्कप्रमुखपदी इम्रान शेख तालुका कार्यकारणी सदस्यपदी सागर झेंडे

राईट टू गन (Right to Gun)- शेतकऱ्यांचा जीव महत्वाचा की हिंस्त्र प्राण्यांचा? महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात 348 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 2022 साली वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी असे  7021 पाळीव प्राणी दगावले आहेत. मालमत्ता, पीक नुकसान व जखमींचा तर हिशेबच नाही.

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool

Rea More Articles